April 22, 2024 9:27 pm

7k Network

लोणीकंद पोलिसांचा अवैध धंद्यांना आशीर्वाद आयुक्तांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा

पुणे-नकाही वर्षांपूर्वी नव्यानेच शहर पोलीस आयुक्त कार्यालयात समाविष्ट झालेल्या लोणीकंद पोलिसांचा अवैध धंद्यांना उत्कृष्टपणे आशीर्वाद लाभत असल्याने अशा धंद्यामुळे पोलिसांकडूनच अवैध धंद्यांना आशीर्वाद लाभून आयुक्तांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्याचे दिसून येत आहे.  यापूर्वी ग्रामीण भागात समाविष्ट असलेल्या लोणीकंद पोलीस स्टेशनचा दोन ते चार वर्षांपूर्वी शहर पोलीस आयुक्त कार्यालय अंतर्गत समावेश करण्यात आला असला तरी पण या हददीत जवळपास वाघोली,केसनंद,वाडेबोल्हाई,अष्टापूर.पिंपरी सांडस या गावासह जवळपास एकोणतीस गावांचा समावेश जरी करण्यात आला असला तरी पण अशा गावांनी ढाब्याच्या नावाखाली सर्रासपणे अवैध दारूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत असला तरी पण अशा धंद्यांना पोलीस खात्यांचा सर्रासपणे आशीर्वाद लाभत असल्याचे चित्र दिसून येत बाहे. कारण एका हॉटेल व्यावसायिकाकडून पोलीस खात्याकडून खुलेआमपणे हप्तेवसुली जोरात सुरु आहे. त्यामुळे हॉटेलव्यावसायिकांच्या विरोधात कोणी ही नागरिक तक्रार करण्यास गेल्यास व्यावसायिकांच्या व पोलीस खात्याच्या दबावाखाली अशा नागरिकास झुकते माप घेण्याची वेळ येऊन त्यांच्या दहशतीचा सामना करण्याची वेळ येत असल्याने याविरोधात कोणी आवाज उठविण्यास धजावत नाही.  एवढ्यावरच पोलीस खाते न थांबता गावठी दारूंना देखील त्यांचे आशीर्वाद लाभत आहे. अनेक तरुण वर्ग अशा दारूच्या आहारी जाऊन ते व्यसनाधीन होऊन त्यांचे संसार उध्वस्त पोलिसांच्या समोर उध्वस्त होऊन देखील पोलीस मात्र अशा धंद्यावर कारवाई करण्याऐवजी गप्प मूग गिळून बसत आहे. एका गावांनीच जवळपास सात ते आठ अवैध धंद्यांचे जाळे पसरल्याने एकोणतीस गावे दिडशे ते दोनशे अवैध धंद्यांनी वेढा घातला आहे. विशेष म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यापासून ते वसुली कर्मचाऱ्यापर्यंत अशा अवैध धंदे व्याल्याकडून हप्ते वसुली तेजीस अशा व्यावसायिकाकडून सुरु आहे. याबरोबरच केसनंद परिसरात तर राहुल राखपसरे या गावठी धंदा व्यावसायिकाचा धंदा इतक्या प्रमाणात तेजीत आहे की,या ठिकाणी वसुली करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यास महिन्याला संबंधित  व्यावसायिकाकडून पाचशे रुपयापासून ते हजार रुपयांपर्यंत हप्ता देण्यात येतो. मग वसुली वाल्यास किती हप्ता देण्यात येत असेल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे लोणीकंद पोलीस स्टेशन हददीत महिन्याला अवैध मार्गातून लाखो रुपयांचा महसूल होत आहे. यासंदर्भात हददीतील अवैध धंदे बंद करण्याची मागणी नागरिकांकडून पोलीस खात्याकडे वारंवार करून देखील बेकायदेशीर होणाऱ्या हप्ते वसुलीमुळे पोलिसांनी देखील नागरिकांच्या तक्रारीकडे डोळेझाक केल्याने पोलीस आयुक्तांनी शहराचा पदभार स्वीकारण्यापूर्वी हददीत सुरु असणारे अवैध धंद्यांना लगाम लावण्याचा केलेला दावा पोलीस यंत्रणेमुळे फोल ठरून तो फुसका बार ठरला आहे. व दिलेल्या आश्वासनांचा चक्काचूर होऊन ती हवेत विरल्याने सर्वसामान्य जनतेने ज्यांच्याकडे न्याय देवता म्हणून पाहिले होते. त्यांच्याकडूनच जनतेच्या अपेक्षांचा भंग होत असल्याने कुपमंच शेत खाण्याचे काम करत असेल तर आज पोलिसांच्या दुर्लक्षित कारभारामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत राहण्याची वेळ येत असल्याने अशा धंद्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Star News India
Author: Star News India

Digital News Media

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज