April 22, 2024 9:28 pm

7k Network

जीवन ज्योती प्रतिष्ठान व ओम साई मित्र मंडळ यांच्या वतीने भिम नगर मध्ये सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त लहान मुलापासून युवक युवती व महिला यांच्यासाठी मैदानी खेळाचे नियोजन करण्यात आले

जीवन ज्योती प्रतिष्ठान व ओम साई मित्र मंडळ यांच्या वतीने भिम नगर मध्ये सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त लहान मुलापासून युवक युवती व महिला यांच्यासाठी मैदानी खेळाचे नियोजन करण्यात आले
सध्याच्या काळात लहान मुलं मोबाईल मध्ये व्यस्त असल्याकारणाने मैदानी खेळायचा अनुभव जवळपास विसरत चालले असल्याकारणाने प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे त्यामध्ये लहान मुलं तर सहभागी होतच आहे परंतु महिला वर्ग देखील जास्त प्रमाणात सहभागी होत आहे प्रत्येक स्पर्धकास भाग घेतल्यानंतर त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी योग्य ते बक्षीस व लहान मुलांना शैक्षणिक साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येत आहे
पैठणीची मानकरी आरती मलके या ठरल्या
संगीत खुर्ची, नेमबाजी १०० मीटर धावणे, बास्केटबॉल, तीन पायाची शर्यत, लांब उडी, इत्यादी स्पर्धेचं नियोजन केला आहे
पैठणी साडी, इस्त्री, टेबल फॅन, त्याचप्रमाणे गहू, तांदूळ, ज्वारी, साखर, बाजरी, प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येत आहे
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे संस्थापक जितेंद्र कराळेकर राहुल जाधव दीपक गायकवाड रोहित गवळी विनोद गायकवाड रमेश चव्हाण यशराज कराळेकर रितिक चव्हाण शुभ तामचिकर श्रीकांत कांबळे साईराज शेवाळे रितेश चव्हाण विशाल राठोड इत्यादींनी परिश्रम घेतले

Star News India
Author: Star News India

Digital News Media

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज