April 22, 2024 9:28 pm

7k Network

येरवड्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

star news india येरवड्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट
पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
पुणे-येरवडा परिसरात पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढल्याने येरवडा पोलिसांकडून आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा अवैध धंद्यावर कारवाई होणार का?हा मुख्य प्रश्न नागरिकांना सतावत आहशहराचे -प्रवेशव्दार म्हणून येरवडा उपनगर भागाकडे प्रामुख्याने पाहिले जात आहे. त्यामुळे या भागाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यातच परिसरात पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यासह परराज्यातून नागरिक विशेष करून स्थायिक झाले असले तरी पण प्रामुख्याने असणारा भाग हा झोपडपट्टीचा आहे. त्यातच या प्रथम गुन्हेगारीचा परिसर म्हणून पाहिले जात असले तरी पण मध्यंतरीच्या काळात खाजगी कंपन्यांचे जाळे ही पसरल्याने कालांतराने असणारा शिक्का हा नष्ट होऊ लागला होता. पण सध्या परिसरात मटका,गावठी दारू,सोरेट,ऑनलाईन लॉटरी,व्हिडीओ पार्लर,लॉजिंग,वेश्या व्यवसाय,देशी विदेशी दारू,हॉटेल बार,गुटखा,जुगार ,गांजा अशा अवैध धंद्यांचे जाळे या भागात मोठ्या प्रमाणात पसरल्याने परिसरातील नागरिकांना जगणे अवघड झाले आहे. पाच ते सहा महिन्यापूर्वी गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एकाच महिनाभरात खुनाच्या चार घटना घडल्याने या भागातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शहराचे पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारतांना शहरासह उपनगर भागातील वाढलेल्या गुन्ह्यांसह अवैध धंदयांना लगाम बसविणार असल्याचा दावा सर्वसामान्य जनतेसमोर केला होता. मात्र या भागात पोलिसांच्या आशीर्वादाने सर्रासपणे असलेल्या अवैध धंद्यामुळे पोलीस आयुक्तांच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनाला पोलीस खात्याकडून केराची टोपली दाखविण्यात येत आहे. त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्राने देखील हळूहळू डोके वर काढण्यास सुरुवात केली असून यामध्ये सर्वसामान्य जनतेचे मरण होत असतांना देखील अशा धंद्याकडे पोलीस यंत्रणाच जर डोळेझाक करण्याचे नाटक करत असेल तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कोणाकडे?हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनांचा फुसका बार ठरून तो पोलिसांचा आशिर्वदाने हवेत वीराला असल्याचे चित्र सध्या तरी परिसरात पाहायला मिळत असून गुन्हेगारीला खतपाणी घालण्याचे काम या भागातील पोलीस यंत्रणेकडून होत आहे. त्यामुळे जनतेला देखील न्यायापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. तरी जनतेचा मुख्य प्रश्न लक्षात घेऊन या भागातील अवैध धंद्यांना लगाम लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Star News India
Author: Star News India

Digital News Media

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज