April 22, 2024 11:16 pm

7k Network

कोंढवा येथील कॅफे फार्म हाऊसच्या अन्नात झुरळ ! हॉटेल मालक खेळतोय लोकांच्या जीवाशी; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष ?

कॅफे फार्म हाऊसच्या अन्नात झुरळ ! हॉटेल मालक खेळतोय लोकांच्या जीवाशी; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष ?

स्टार न्युज इंडिया । प्रतिनिधी : कॅफे फार्म हाऊसच्या अन्नात झुरळं निघाल्याने ग्राहकांची एकच तारांबळ उडाली ही घटना काल दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी ९:३० च्या दरम्यान घडली त्यावेळी एक पत्रकार त्यांच्या मित्रांसोबत त्या ठिकाणी मिटिंग साठी बसले असता त्यांनी एक खाद्यपदार्थ ऑर्डर केले असता त्या खाद्यपदार्थांमध्ये झुरळं निघाले ही एक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब असून त्या ठिकाणी असणारे ग्राहक देखील चिंतीत झाले कारण झुरळे हे संसर्गजन्य जीव आहेत आणि ते अन्नपदार्थांमध्ये रोग निर्माण करू शकतात हे टाळण्यासाठी अन्न सुरक्षित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी याची सर्वस्वी जबाबदारी ही या हॉटेल चालकावर असताना त्याने याकडे दुर्लक्ष केले आहे असेच दिसून येत आहे

दक्षता ही आपल्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते याची जाणीव या हॉटेल चालकाला करून देणे अत्यंत महत्वाचे आहे याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे परंतु याठिकाणी तर असे दिसून येते कि, आरोग्य विभाग झोपा काढत असून मुजोर हॉटेल चालकांमुळे नागरिकांच्या जीवाला वाढवतोय धोका ? हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे व अन्न व औषध प्रशासनाचे याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते का ? असा सवाल ग्राहकांच्या मनात निर्माण झाला आहे

पुणे शहरातील कोंढवा भागातील साळुंखे विहार रोडवर प्रसिद्ध असे असणारे कॅफे फार्म हाऊसचा किसाळवाणा एकदम गलिच्छ प्रकार समोर आला असून खाद्यपदार्थांमध्ये झुरळ दिसू लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत कॅफे फार्म हाऊसच्या मालकास अन्न परवाना ( फूड लायसन्स ) बाबत विचारणा केल्याने त्याने उडवा उडवीची उत्तर दिली आहेत  कॅफे फार्म हाऊस या ठिकाणी नाश्ता व जेवणासाठी नागरिकांची चांगलीच वर्दळ असते, परंतु सदरील ठिकाणी आतमध्ये घाणीचे साम्राज्य असल्याचे शंका निर्माण झाली आहे अनेकांनी या बाबतीत निराशा व्यक्त केली होती. परंतु या मुजोर हॉटेल चालकाचे संबंध काही पोलिसां सोबत असल्याने याला कारवाईची भीती राहिली नसल्याने बाहेरील कीटक आणि झुरळांपासून संरक्षण करण्यासाठी अन्नपदार्थ सुरक्षित ठिकाणी हाताळून तसेच, अन्नपदार्थांचे पुनरावलोकन आणि नियमित तपासणी करून खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक असताना असे केले नाही

यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्या परिसरातील सर्व हॉटेल्स व केटरिंगचे दुकानांची कडक तपासणी करण्याची मागणी होत आहे. हॉटेल चालकांची तपासणी करणे ही जबाबदारी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाची व अन्न व औषध प्रशासनाची असल्याने, तपासणीच केली जात नसल्याने असे गलिच्छ प्रकार समोर येत आहेत. तर स्थानिक नागरिकांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

Star News India
Author: Star News India

Digital News Media

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज