
Pune Police | कोंढवा पोलीस तपास पथकाची धडाकेबाज कारवाई: भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टा, पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त
कोंढवा पोलीस तपास पथकाची धडाकेबाज कारवाई: भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टा, पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त स्टार न्युज इंडिया । प्रतिनिधी : पुणे, १४ मे २०२५: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक करून मोठी कारवाई केली आहे. दिनांक ९ मे २०२५ रोजी रात्री २१:२५ वाजता कोंढवा बुद्रुक येथील शांतीबन सोसायटीजवळील मोकळ्या जागेत सापळा रचून पथकाने एका १९ वर्षीय तरुणाकडून १ गावठी कट्टा, १ गावठी पिस्टल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईत जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे ७१,५०० रुपये आहे. कारवाईचा तपशील कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने ही कारवाई केली. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कोंढवा परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष पेट्रोलिंगचे आदेश देण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून पथकातील पोलीस हवलदार सतीश चव्हाण आणि विशाल मेमाणे यांना गुप्त