April 22, 2024 9:26 pm

7k Network

भर पावसात पोलिसांची पेट्रोलिंग विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी 

स्टार न्युज इंडिया – पुणे-विश्रांतवाडी पोलिसांची भर पावसात विश्रांतवाडी परिसरात गस्त घातल्याने या कामगिरी बाबत नागरिकांकडून पोलीस यंत्रणेचे कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सध्या शहरासह उपनगर परिसरात श्री गणरायांच्या आगमनाने कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातवरण असून विश्रांतवाडीसह,धानोरी,कळस भागात अनेक मंडळांच्या वतीने गणपती बसविण्यात आले आहे. त्यातच अशा  मंडळांनी लावलेल्या डीजेच्या तालावर कार्यकर्ते ताल धरत आहे. मात्र अशा वेळेस विविध कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.याबरोबरच गणपती काळात काही अनुचित घटना घडू  नयेत याकरिता पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या बैठका घेऊन पोलीस यंत्रणेला; सतर्क राहण्याचे आदेश दिल्यामुळे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी शुक्रवार (दि. २२) रोजी संध्याकाळच्या भर पाऊस पडत असतांना देखील पोलीस यंत्रणेला गस्त घालण्याचे आदेश दिले होते. व पोलीस यंत्रणेने देखील वरिष्टांच्या आदेशाचे पालन करून भर पावसात गस्त घातल्याने नागरिकांमध्ये देखील उत्साह निर्माण होऊन त्यांच्या या कार्याचे परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी पोलीस स्टेशन दत्तात्रय भापकर यांनी देखील पोलीस यंत्रणेच्या कार्याची दखल घेऊन कौतुकाची थाप टाकली आहे. गस्ती दरम्यान पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड,पो.ना. इप्पर,गुरव,मुंजनकर ,धोडरे,गाडे,चव्हाण,भगत,शिरसाठ,पवार यांनी गस्तीमध्ये सहभाग घेतला होता.    

Star News India
Author: Star News India

Digital News Media

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज