April 22, 2024 9:26 pm

7k Network

धानोरीत बोगस मेडिकल व्यावसायिकांचा सुळसुळाट 

पुणे-धानोरी परिसरात बोगस मेडिकल व्यावसायिकांचा सुळसुळाट वाढल्याने अशा व्यावसायिकांवर लगाम लावणार कोण?हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या शहरासह उपनगर भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढल्याच्या घटना वारंवार ऐकायला मिळत आहे. मात्र डॉक्टरांपाठोपाठ बोगस मेडिकल व्यावसायिकांनी देखील अशा धंद्याकडे लक्ष केंद्रित करून डोके वर काढल्याची घटना नुकतीच धानोरी परिसरातील मुंजाबा वस्ती या ठिकाणी उघडकीस आली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. धानोरी भागातील मुंजाबा वस्ती हा प्रकार उघडकीस आला आहे. दोन दिवसापूर्वी वस्तीवरील असणारा एक रुग्ण परिसरातील रुग्णालयात गेला असता तेथील डॉक्टरांनी बाहेरील त्यास औषधे दिल्यावर संबंधित व्यक्ती श्री गणेश मेडिकल स्टोअर्स येथे औषधे घेण्यासाठी गेला असता त्यास आढळून आले की,मेडिकल चालविणाऱ्या सुरेश चौधरी व त्याची पत्नी इंदिरा चौधरी हे दोघे कोणत्याही प्रकारचे मेडिकल चालविण्याचे प्रशिक्षण नसून ते  अवैधरित्या हा व्यावसाय चालवत आहे. त्याच्याकडे मेडिकल  परवांना आहे पण तो त्याच्या भाचीच्या नावावर आहे.पण तरी ही  संबंधित व्यक्ती मेडिकल व्यावसाय चालवीत आहे.याचबरोबर ते जीएसटीचे बिल देतांना देखील पक्के न देता कोऱ्या कागदावर देत असल्याने प्रशासनाची किती मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून शासनाचा कर बुडवत असल्याचे स्पष्ट होत आहे. पण एखाद्या रुग्णास चुकीचे औषध दिल्यास व त्यास काही त्रास झाल्यास याला जबाबदार कोण?असा संतप्त सवाल महिला सामाजिक कार्यकर्त्या सोनाली गोसावी यांनी केला आहे. याबरोबरच अशा व्यावसायिकांना प्रशासन अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळते का?हा मुख्य सवाल गोसावी यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अवैध रित्या व खुलेआमपणे बेकायदेशीर व्यावसाय करणाऱ्या अशा व्यावसायिकांवर कारवाई होणे काळाची गरज असून अन्यथा अशा व्यावसायिकांना मोकळे रान सापडेल.त्यामुळे जनतेची दिशाभूल करून बेकायदेशीरपणे मेडिकल चालविणाऱ्या अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी महिला सामाजिक कार्यकर्त्या सोनाली गोसावी व राजश्री ताठे यांनी केली आहे.   

Star News India
Author: Star News India

Digital News Media

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज