April 22, 2024 8:54 pm

7k Network

अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीच्या गिरक्यात येरवडा चूक पालिकेची सजा वाहनचालकांना

पुणे येरवडा दि.३० पालिकेच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक व्यावसायिकांनी पुणे नगर महामार्गावर कब्जा केल्याने याचा नाहक त्रास वाहनचालकांना करण्याची वेळ येत असल्याने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पुणे नगर महामार्गावरून येरवडा परिसरातून उपंगरासह मराठवाडा,विदर्भ भागाकडे मार्ग जात असल्याने या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर दिसून येते.त्यातच शहराचे प्रवेशव्दार म्हणून प्रामुख्याने येरवडा परिसराकडे पाहिले जात असल्याने या भागाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.मात्र या भागातील गाडीतल परिसरातून मोठ्या प्रमाणात अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावरच अतिक्रमण करून रस्ता व्यापल्याने याचा नाहक त्रास वाहनचालक यांच्यासह प्रवाशांना सहन करावा लागत आहे.या ठिकाणीच उपनगर भागाकडे जाणाऱ्या बसेस थांबत असल्याने प्रवाशी देखील येथे थांबत आहे.पण व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे येणाऱ्या बसेसचा अंदाज येत नसल्याने प्रवाशांना तासनतास थांबण्याची वेळ येते.आणि त्यात अधिक भर पडते ती रिक्षाचालकांची अनेक रिक्षाचालक बस थांब्यावर याच्यामुळे प्रवाशी देखील हैराण झाले आहेत करण्यात असलेले अतिक्रमण हे गाडीतल ते चित्रा टॉकीज चौकापर्यंत असल्याने या मार्गावर अनेक छोट्या मोठ्या अपघातांच्या घटना घडून अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडत असल्याने झोपी गेलेल्या पालिका प्रशासनाला जाग येणार का?असा संतप्त सवाल येरवडा कराकडून करण्यात येत आहे.परिसरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे संध्याकाळच्या सुमारास पादचारी नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करण्याची वेळ येत आहे.नगर च्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर खाजगी पेट्रोल पंप असून त्यामुळे देखील वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे.होणाऱ्या कोंडी मुळे वाहनचालकांना तासनतास कोंडीत अडकण्याची वेळ येत आहे.कोंडीसांदर्भात परिसरातील नागरिकांनी अनेकदा लेखी अर्ज करून सुध्दा पालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मुख्य समस्येकडे पाठ फिरविली असल्याची तक्रार जनतेकडून करण्यात येत आहे.तरी वाहतूक कोंडीची मुख्य समस्या लक्षात घेऊन पालिका अतिक्रमण विभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.__पालिकेच्या वतीने संबंधित व्यावसायिकांना परवाना देण्यात आल्याने अशा व्यावसायिकावर कारवाई करू शकत नाही.__धनंजय नेवसे _अतिक्रमण निरीक्षक _येरवडा,धानोरी,कळस क्षेत्रीय कार्यालय या मार्गावरून आंतराराष्ट्रीय विमानतळाकडे मार्ग जात असल्याने संबंधित मार्ग हॉकर झोन आहे.त्यामुळे पालिकेच्या वतीने देण्यात असलेली परवानगी चुकीची आहे._संचल कदम_सामाजिक कार्यकर्ते_ ओळ__वाहतूक कोंडीत अडकलेला पुणे_नगर महामार्ग

Star News India
Author: Star News India

Digital News Media

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज