April 22, 2024 8:54 pm

7k Network

पोलीस काकांना चिमुकल्यांनी बांधल्या राख्या विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये रक्षा बंधन साजरी

   स्टार न्युज इंडिया दि.२९-पोलीस काका म्हटले की,अनेक लहान मुलांमध्ये अंगावर काटा फुटतो व मनात भीतीचे वातावरण पसरते. मात्र आज प्रत्यक्षात पोलीस काकांना भेटण्याचा आगळावेगळा अनुभव या लहान मुलांनी प्रत्यक्षात घेतल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आज चेहरा फुलून त्यांच्या आनंद दिसून येत होता. निमित्त होते रक्षाबंधनचे  विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये लहान मुलांनी रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. धानोरी येथील प्रगती इंग्लिश स्कुल मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आज रक्षाबंधन साजरी केली. यादरम्यान विद्यार्थिनींनी पोलीस काकांना राखी बांधून हा सण साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यासह कळस येथील महिलांनी देखील या सणात उत्साहात सहभाग घेतला होता. विद्यार्थिनींनी पोलिसांना राखी बांधून व स्वतः बनविलेले साहित्य हे पोलीस काकांना भेट देण्यात आली. तर पोलिसांनी देखील त्यांच्या उत्साहात सहभाग नोंदवून मुलांना खाऊचे वाटप केले. तर कळस येथील माजी नगरसेवक सतीश म्हस्के,मीनाक्षी म्हस्के यांनी देखील सहभाग घेऊन महिलांच्या वतीने त्यांना राख्या बांधण्यात आल्या. यावेळी रत्नमाला गायकवाड,विद्या चव्हाण,विद्या जगताप,वैशाली कदम,विमल अहिरे,मिथिलेश वर्मा,सुवर्णा पवार,सुप्रिया म्हस्के या महिलांनी पोलिस बांधवांना राखी बांधली.सदर कार्यक्रम विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रम दरम्यान पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते,मंगेश चव्हाण,सत्यवान गेंड,सुधा चौधरी,भाऊ चव्हाण,गणेश पारडे,प्रफुल्ल मोरे,विकास दुर्गाडे,सुनील राठोड,संदीप ठाकूर,तुकाराम शिंदे,संतोष रणगाडे,अनिल भारमल,शेखर शिंदे,शेखर खराडे,संतोष ठाकूर आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रम विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षात उत्साहात पार पडला.————फोटो ओळ——–येरवडा——पोलीस काकांना उत्साहात राखी बांधतांना बाळ चिमुकली.     

Star News India
Author: Star News India

Digital News Media

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज