April 22, 2024 8:43 pm

7k Network

फुलेनगर मधील भुयारी मार्गाची दुरवस्था प्रशासनाचे कोट्यवधीचा खर्च पाण्यात

स्टार न्युज इंडिया येरवडा—फुलेनगर_इंदिरानगर भागाला जोडणाऱ्या भुयारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने प्रशासनाच्या करण्यात आलेला खर्च पाण्यात गेल्याने भूयारीमार्ग दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.डा भागातून श्री क्षेत्र आळंदी भागाकडे मार्ग जात असल्याने या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असल्याने फुलेनगर_इंदिरानगर भागातील नागरिकांना रस्ता पार करताना जीव मुठीत घेऊन जाण्याची वेळ येत होती.त्यातच अनेकदा छोट्या_मोठ्या अपघाताच्या घटना घडल्याने प्रशासनाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून भुयारी मार्गाची उभारणी करण्यात आली.मात्र सध्या भुयारी मार्गास बसविण्यात आलेले प्रवेशवडाराचे लोखंडी शटर तुटलेल्या अवस्थेत आहेत.तर जिन्यास बसविण्यात आलेल्या फरशा फुटल्याने ऐन पावसाळ्यात जिण्यातून जाताना अनेक नागरिक घसरून जखमी झाले आहेत.

तर भुयारी मार्गात अंधारमय वातावरणातून नागरिकांचा बचाव होण्यासाठी वीजमीतर बसविले आहेत.पण त्याच्या केबल तुटल्याने व बल्ब अथवा त्युब गायब केल्याने बसविण्यात आलेले वीजमिधुळखात पडून आहेत.त्यामुळे दिवसा परिसरात अंधारमय वातावरण असल्याने नागरिकांना जाताना जीव मुठीताच घेऊन जाण्याची वेळ येत आहे.तर भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचून परिसर दुर्गंधीमय झाल्याने घाणीचे साम्राज्य पसरल्याने डासांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.तर पाण्याच्या टाकीत बाटल्या अस्ताव्यस्त पडून कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.तर अनेक दारुडे हे भुयारी मार्गाचा गैरवापर करत असल्याने असणारा भुयारी मार्ग हा तळीरामाचा अद्दाच बनल्याने हा भुयारी मार्ग आहे का? तळी रामाचा अद्दा हा मुख्य प्रश्न नागरिकांना सतावत असून दुरावस्थेत अडकलेल्या भुयारी मार्गाची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरकांनी केली आहे.____चौकट_&_दुरावस्था झालेल्या भुयारी मार्गाची पाहणी करून संबंधित अभियंता यांना दुरुस्ती करण्यास सांगते._इंद्रायणी करचे __गायकवाड___चौकट____गेल्या अनेक वर्षापासून भुयारी मार्गकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष देऊन ते दुरुस्त करावे.__गणेश ढोकले___फोटो ओळ__येरवडा__१)भुयारी मार्गातील प्रवेशवदाराची झालेली दुरवस्था,२)फुटलेल्या फरशा,३)धूळखात पडून असलेले वीजमिटर,४)भुयारी मार्गात साचलेले पाणी व साचलेल्या कचऱ्यामुळे पसरलेले घाणीचे साम्राज्य

Star News India
Author: Star News India

Digital News Media

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज