7k Network

स्टार न्युज इंडिया @ मुलींचे शासकीय वसतिगृह धूळखात पडून प्रशासनाचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात

स्टार न्युज इंडिया
मुलींचे शासकीय वसतिगृह धूळखात पडून
प्रशासनाचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात
येरवडा_दी.४_समाजातील गोरगरीब गरजूवंत मुळीकरीता उभारण्यात आलेले शासकीय वसतिगृह गेल्या अनेक वर्षापासून धूळखात पडून असून संबंधित वसतीगृहाचा मुलींना लाभ मिळणार का?असा सवाल विद्यार्थिनींच्या पालकांकडून करण्यात येत आहे.
येरवडा परिसरात आळंदी मार्गावर प्रशासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करुन मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह उभारण्यात आले आहे.मुलांच्या वसतिगृहात राज्यभरातून जवळपास१३६मागासवर्गीय कुटुंबातील मुले शिक्षणाचा लाभ घेत आहेत.या ठिकाणी विद्यार्थ्यांची योग्य प्रकारे सुविधा करण्यात आली आहे.याबरोबरच या वसतिगृहलगतच मुलींचे चार मजली वसतिगृह उभारण्यात आले आहे.संबंधित इमारत उभारनीकरिता प्रशासनाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.मात्र इमारतीच्या परिसराची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे चित्र यास ठिकाणी आल्यावर पाहायला मिळत आहे.वसतिगृह लगतच मुलींच्या जेवनाकरिता भोजन कक्ष उभारण्यात आले आहे.मात्र या ठिकाणच्या आवारात झाडेझुडपे वाढल्याने सरपटणाऱ्या प्राण्याचा वावर वाढल्याने इतर मुलामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबरोबरच भोजन कक्षाचे लोखंडी प्रवेश व्दार गंजलेल्या अवस्थेत आहेत.तर परिसरात मोठ्या प्रमाणात राडारोडा व कचऱ्याचे साम्राज्य पसरल्यामुळे परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने याचा त्रास इतर विद्यार्थ्यांना होत आहे.त्यामुळे ते देखील या त्रासाने हैराण झाले आहेत.याबाबत विद्यार्थ्यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तक्रार करून देखील अधिकाऱ्यांनी मुख्य समस्येकडे पाठ फिरवल्याने त्यांना न्यायाच्या प्रतीक्षेत राहण्याची वेळ येत आहे.परिसरात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी लाईन टाकण्यात आली पण त्यावरील लोखंडी जाळ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत.वसतिगृह च्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या अवस्थेत असल्याने लोखंडी जाळ्या गंजलेल्या अवस्थेत असून खिडक्या बाराही महिने उघड्या असल्याने आतील खोल्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहेत.तर स्वच्छतागृहा तील साहित्य उघड्यावर अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचे दिसून येत आहे तर वसतिगृह साठी लागणारा कडप्पा देखील उघड्यावरच पडल्याने एखाद्या दिवशी कडाप्प्यांची चोरी झाली तर यास जबाबदार कोण?असा सवाल परिसरातील नागरिक करत आहेत.तरी गेल्या अनेक वर्षापासून धूळखात पडून असलेले मुलींचे वसतिगृह ची सुधारणा करण्यात यावी व ते सुरू करण्यात यावीत जेणे करून समाजातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थिनी शिक्षणाचा लाभ घेतील अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.______चौकट___सध्या मुलांचे वसतिगृह सुरू असून याची जबाबदारी मी सांभाळत आहे.पण मुलींचे वसतिगृह सुरू होण्या संदर्भात प्रशासन वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती___पी.बी.पवार__वसतिगृह अधिकारी(मुलांचे)______फोटो ओळ___येरवडा___१) मुलींच्या वसतिगृह मधील धूळखात पडून असलेला भोजन कक्ष, २)पावसाळी लाईंमधील तुटलेल्या लोखंडी झालीय, ३) धोलखात पडून असलेले मुलींचे वसतिगृह, ४) परिसरात कचऱ्याचे साम्राज्य ,४)वसतिगृह आवारात वाढलेली झाडेझुडपे

Star News India
Author: Star News India

Digital News Media

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज