Crime
CRIME NEWS | विमानतळ पोलीसांची धडाकेबाज कारवाई १ पिस्टल २ जिवंत राऊंड जप्त
Airport Police's explosive action: 1 pistol, 2 live rounds seized, Pune Majha News - Representative Pune: Policemen are called upon to put down criminal activities day in and day out.
S
StarNews Admin
Monday, 28 November 2022 at 06:34 pm5 min read
Share:

FILE PHOTO
विमानतळ पोलीसांची धडाकेबाज कारवाई १ पिस्टल २ जिवंत राऊंड जप्त
पुणे माझा न्युज - प्रतिनिधी पुणे : दिवसेंदिवस गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर येत आहे विमान तळ हद्दीत एक इसम पिस्टल घेऊन घातपात करण्याच्या तयारीत असताना कर्तव्य दक्ष विमानतळ पोलिसांनी जागरूकता दाखवत धडक कारवाई करून १ पिस्टल २ जिवंत राऊंड आरोपी कडून जप्त केले आहे. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे,पोलीस निरीक्षक, गुन्हे, मंगेश जगताप पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे असे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलिस नाईक गिरिष नाणेकर व सचिन जाधव यांना त्यांचे बातमी दारांमार्फत बातमी मिळाली की,खुळेवाडी कॉर्नर पुणे नगर रोड येथे मोकळया मैदानात एक इसम थांबलेला असुन त्याचे कडे पिस्टल व राऊंड असुन तो कोणाची तरी वाट पाहत आहे.
त्याप्रमाणे सापळा लावुन संतोष शंकर गुंजाळ वय २६ वर्ष रा. स.नं. १६५, दगडी हौदाजवळ माळवाडी, हडपसर यास पकडले असता त्याचेकडे ५०हजार २०० रुपये किंमतीचे १ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत राऊंड मिळुन आले असुन ते जप्त करण्यात आलेले आहेत. सदर इसमाविरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ४५० / २०२२ शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
तसेच सदरचा पिस्टल कोठून व कशासाठी आणले होते याबाबत पुढील तपास सहा पोलीस फौजदार अविनाश शेवाळे हे करीत आहेत. विलास सोंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,मंगेश जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शना खाली पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे,अविनाश शेवाळे, सचिन कदम,सचिन जाधव, उमेश धेंडे, गिरिष नाणेकर,अंकुश जोगदंडे,नाना कर्चे,योगेश थोपटे, संजय आसवले यांचे पथकाने केली आहे.

Tags:
Crime
crime news
Social
क्राईम न्युज
क्राईम न्यूज
S
StarNews Admin
News Desk
Trusted, Unbiased, For the People.
