Star News Logo
>>>PUNE CRIME NEWS | बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगून दहशत माजविणाऱ्या आरोपीस येरवडा पोलीस तपास पथकाकडून अटक
Crime

PUNE CRIME NEWS | बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगून दहशत माजविणाऱ्या आरोपीस येरवडा पोलीस तपास पथकाकडून अटक

बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगून दहशत माजविणाऱ्या आरोपीस येरवडा पोलीस तपास पथकाकडून अटक पुणे माझा न्युज । प्रतिनिधी पुणे : येरवडा परिसर हा दाट वस्तीने गजबजलेला असून याच परिसरात वाढती गुन्हेगारीला आळा घा...

S
StarNews Admin
Saturday, 31 December 2022 at 06:15 pm5 min read
Share:
PUNE CRIME NEWS | बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगून दहशत माजविणाऱ्या आरोपीस येरवडा पोलीस तपास पथकाकडून अटक
FILE PHOTO
बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगून दहशत माजविणाऱ्या आरोपीस येरवडा पोलीस तपास पथकाकडून अटक पुणे माझा न्युज । प्रतिनिधी पुणे : येरवडा परिसर हा दाट वस्तीने गजबजलेला असून याच परिसरात वाढती गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम हे येरवडा पोलीस करत आहेत अनेक गुन्हेगारांवर पाळत ठेऊन तपास पथकातील पोलीस त्यांना अटक करण्याचे काम करत असतात येरवडा परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस तपास पथकास त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की इसम नामे विकास भगत तौर हा येरवडा येथील क्षिरसागर हॉलचे मागे थांबलेला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळवून त्यांनी कारवाई करणेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी पोलीस उप-निरीक्षक अंकुश डोंबाळे, पोलीस अंमलदार पो.हवा दत्ता शिंदे, तुषार खराडे, राहुल परदेशी, कैलास डुकरे, सुरज ओंबासे यांनी इसम नामे विकास भगत तौर वय ३५ वर्षे रा स नं १२ क्षिरसागर हॉल येरवडा पुणे यास सापळा रचून पकडण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल मिळून आले. सदरबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे गुर नं ६२०/२०२२ भारतीय हत्यार कायदा ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि विशाल पाटील करत आहेत. सदरची कामगिरी श्री शशिकांत बोराटे सों, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४ श्री किशोर जाधव साो सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. बाळकृष्ण कदम, वपोनि येरवडा, श्री. उत्तम चके, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, सपोफी प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे.. दत्ता शिंदे, तुषार खराडे, पोना किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, किरण अब्दागिरे, प्रविण खाटमोडे, पोअं राहुल परदेशी, सुरज ओंबासे, अनिल शिंदे, काशिनाथ गद्दे यांनी केलेली आहे.
PUNE CRIME NEWS | बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगून दहशत माजविणाऱ्या आरोपीस येरवडा पोलीस तपास पथकाकडून अटक - Image 2
Tags:
crime news
क्राईम न्युज
क्राईम न्यूज
S

StarNews Admin

News Desk

Trusted, Unbiased, For the People.