Star News Logo
>>>भारतीय जनता पार्टी हडपसर मतदार संघाचे माजी आमदार योगेश टिळेकरां सहित ४१ जणांवर गुन्हे दाखल
व्यापार

भारतीय जनता पार्टी हडपसर मतदार संघाचे माजी आमदार योगेश टिळेकरां सहित ४१ जणांवर गुन्हे दाखल

पुणे माझा न्युज - प्रतिनिधी फैयाज मुल्ला : पुणे महानगर पालिकाकडून पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने व अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही पाणी मिळत नसल्याने . भारतीय जनता पार्टीचे हडपसर विधानसभा मतदार स...

S
StarNews Admin
Tuesday, 6 October 2020 at 01:20 pm5 min read
Share:
भारतीय जनता पार्टी हडपसर मतदार संघाचे माजी आमदार योगेश टिळेकरां सहित ४१ जणांवर गुन्हे दाखल
FILE PHOTO
पुणे माझा न्युज - प्रतिनिधी फैयाज मुल्ला : पुणे महानगर पालिकाकडून पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने व अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही पाणी मिळत नसल्याने . भारतीय जनता पार्टीचे हडपसर विधानसभा मतदार संघातील माजी आमदार योगेश टिळेकर व ४१ जणांनी स्वारगेट पाणी पुरवठा विभागात आंदोलन केले,आंदोलन केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या वडगाव जलशुध्दीकरण केंद्रा अंतर्गत आठवड्यातून एक दिवस काही भागातील पाणी पुरवठा बंद केला जातो. जल केंद्रातून गेली २ वर्षे ही पाणी कपात करण्यात येत आहे. पाणी कपात बंद करून १ ऑक्टोबरपासून सुरळीत पाणीपुरवठा करू, असे आश्वासन महानरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिले होते. तरीही पाणी त्याभागातील नगरसेवकांनी स्वारगेट येथील कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता आशिष जाधव यांना जाब विचारला. तेव्हा पुरवठा सुरळीत न झाल्याने टिळेकर आणि जाधव व आंदोलनकर्त्यांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. याबाबत महापालिकेकडून स्वारगेट पोलिस ठाण्यात आषिश जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर माजी आमदार योगेश टिळेकर, त्यांची आई नगरसेविका रंजना टिळेकर, नगरसेविका राणी भोसले, नगरसेविका मनिषा कदम, वृषाली कामठे यांच्यासह ४१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे.
भारतीय जनता पार्टी हडपसर मतदार संघाचे माजी आमदार योगेश टिळेकरां सहित ४१ जणांवर गुन्हे दाखल - Image 2
भारतीय जनता पार्टी हडपसर मतदार संघाचे माजी आमदार योगेश टिळेकरां सहित ४१ जणांवर गुन्हे दाखल - Image 3
Tags:
ताज्या बातम्या
S

StarNews Admin

News Desk

Trusted, Unbiased, For the People.