Crime
Fun of former corporators of Kondhwa and punishment of citizens | कोंढव्यातील माजी नगरसेवकांची मजा आणि नागरिकांना सजा
कोंढव्यातील माजी नगरसेवकांची मजा आणि नागरिकांना सजा भैरोबनाला येथे जीवघेण्या पद्धतीने बेकायदा पूल बांधला जात आहे तसेच नागरिकांची मोठी फसवणूक करून त्यांचे प्राण धोक्यात घातले आहेत पुणे माझा न्युज । ...
S
StarNews Admin
Thursday, 23 June 2022 at 07:30 pm5 min read
Share:

FILE PHOTO
कोंढव्यातील माजी नगरसेवकांची मजा आणि नागरिकांना सजा
भैरोबनाला येथे जीवघेण्या पद्धतीने बेकायदा पूल बांधला जात आहे तसेच नागरिकांची मोठी फसवणूक करून त्यांचे प्राण धोक्यात घातले आहेतपुणे माझा न्युज । प्रतिनिधी पुणे ; स्वतःच्या स्वार्थासाठी हजारो नागरिकांना धरले वेठीस शिवाय धार्मिक भावनांशी खेळून एका बिल्डरशी हात मिळवणी करून मुस्लिम सुरा ( तबलीग जमात ) जमातीच्या जागेवर कानाडोळा ठेवून मुस्लिम समाजाची दिशाभूल करून कोरोडोची मालमत्ता घशात घालण्याचा प्रयत्न सदर मालमत्ता सर्वे क्र. 41/2 अ, अशोका म्युज पासून जवळच असलेल्या भैरोबनाला येथे जीवघेण्या पद्धतीने बेकायदा पूल बांधला जात आहे. नाल्यांवर सिमेंटचे पाईप टाकून, विट दगड टाकून ते हजारो नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत.
एवढेच नाही तर ते आयोजित करण्यासाठी त्यांनी शेकडो झाडांना कापले गेले, त्याबरोबर पुणे महापालिकेने बांधलेली सुरक्षा भिंतही तोडून, हा रस्ता फक्त आणि फक्त एका बिल्डरचा फायदा करण्यासाठी येथील माजी नगरसेवक व नगरसेविकाचे पती पुढाकार घेऊन करत आहेत यावर आक्षेप घेतला आहे एक समाज सेवक व संविधान अभ्यासक असलम इसाक बागवान यांनी याचा पाठपुरावा करून नागरिकांच्या व जनतेच्या निर्देशनास आणले आहे या ठिकाणी अनधिकृत पणे बांधकाम करून यांनी कोंढवा परिसरातील नागरिकांची मोठी फसवणूक करून तसेच त्यांचे आर्थिक जीवन व प्राण धोक्यात घातले आहेत
सिमेंटचे पाईप टाकून तसेच दगड विट माती टाकून स्वः मालकीच्या प्लॉट करीता पुणे मनपा पथ विभाग, मलनिस्सारण विभाग, बांधकाम विभाग तसेच महत्वाचे पुणे जिल्हा अधिकारी तसेच पुणे महानगरपालिका आयुक्त यांची परवानगी न घेता केवळ सत्तेच्या जोरावर तेथील माजी नगरसेवकांशी संगनमत करून हजारों नागरिकांचे प्राण धोक्यात जाईल अशा तऱ्हेने सिमेंटचे पाईप दगड विट माती टाकून रस्ता बनविला आहे.
तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असून या पाईपात कचरा अडकून पूर-परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येऊ शकत नाही त्याचबरोबर या भागातील हजारो नागरीकांच्या जिवितास धोका निर्माण करून बेकायदेशीर रस्ता केवळ सत्तेच्या धाकावर येथील माजी नगरसेवक तसेच माजी स्थायी समितीचे अध्यक्ष रशिद शेख व इतर बनवित आहे. सदरचा रस्ता बनविताना पुणे मनपा यांनी बांधलेली सुरक्षा भिंतही परवानगी न घेता तोडण्यात आलेली असून मा. महोदय यांनी या घटनेची गांभीर्यने दखल घेवून पुणे महानगरपालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग 2 सावरकर भवन यांना कारवाई करून सदरचे धोकादायक सिमेंट पाईपचा रस्ता काढून यांच्या विरोधात सदोष मृत्यूस कारणीभूत ठरतील अशा कृत्ती तसेच विनापरवाना रस्ता करणे, सुरक्षा भिंत तोडणे या विरूध्दात पुणे पोलिस आयुक्त यांनी यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात यावे व सदरील अनधिकृत सीमेंटचे पाईप दगड विट मातीने बनविलेला धोकादायक रस्ता त्वरीत काढण्यात यावे या करीता असलम इसाक बागवान हे ३० जुन २०२२ रोजी त्या बांधकाम केलेल्या भैरोबा नाला येथे आंदोलनास बसणार असल्याचे यावेळी त्यांनी पुणे माझा न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले

Tags:
क्राईम न्युज
ताज्या बातम्या
S
StarNews Admin
News Desk
Trusted, Unbiased, For the People.
