Crime
Pune Crime | रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडुन एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस जप्त. सिंहगड रोड पोलीस स्टेशनची कामगिरी
रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडुन एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस जप्त. सिंहगड रोड पोलीस स्टेशनची कामगिरी पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : पुणे पोलीस अलर्ट मोडवर असताना शहरात शांतता रहावी या करीता पुण्यात पोलि...
S
StarNews Admin
Wednesday, 2 April 2025 at 09:35 am5 min read
Share:

FILE PHOTO
रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडुन एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस जप्त. सिंहगड रोड पोलीस स्टेशनची कामगिरी
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : पुणे पोलीस अलर्ट मोडवर असताना शहरात शांतता रहावी या करीता पुण्यात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे अशीच गस्त करत असताना सिंहगडरोड पोलीस स्टेशन हद्दीत मा. वरिष्ठांचे आदेशाने गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार सागर शेडगे, देवा चव्हाण, यांना त्याचे खास बातमीदारामर्फत बातमी मिळाली की, पांढऱ्या रंगाचा फुल भाईचा शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेल्या इसमाकडे गावठी पिस्टल असुन तो फनटाईम थेटरचे मागील रोडवर कॅनोल जवळ वडगाव पुणे येथे आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळताच त्यांनी सदरची बातमी सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता, त्यांनी ती मा. वरिष्ठांना कळविल्याने मा. वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्यती कार्यवाही करण्याचे मुखजल आदेश दिल्याने, सदर कार्यवाही करणे कामी वरील स्टाफ सह रवाना झाले मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन पाहणीकरता बातमीतील वर्णनाचा इसम हा फनटाईम थेटरच्या मागील सार्वजनिक रोडवरुन पायी चालत असल्याचे दिसुन आले त्याची व आमची नजरानजर होताच तो आम्हांस पाहुन सदर ठिकाणाहुन निघुन जात असताना त्यास वरील स्टाफच्या मदतीने दि.३१/०३/२०२५ रोजी ००/२० वा. चे सुमारास पकडुन सपोनि निकम यांनी त्यास नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव व पत्ता साहील मार्तंड साखरे वय-२३ वर्षे रा. फ्लॅट नं ४०४, दांगट चाळ, साई चौक, वडगाव बुद्रुक पुणे असे असल्याचे सांगितले त्यास सदर ठिकाणी येण्याचे व आम्हांस पाहुन निघुन जाण्याचे कारण विचारले असता त्यांने आम्हांस उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवु लागल्याने तो काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशानेच थांबला असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही लागलीच पंचासमक्ष त्याची अंगझडती घेता त्याचे त्याचे जवळ ४०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी पिस्टल व २,०००/-रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसे मिळुन आल्याने त्याचेवर सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१७१/२०२५ आर्म अॅक्ट कलम ३ (२५), सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ३७ (१), १३५, अन्वये गुन्हा नोंद करुन त्यास अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा.श्री रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. संभाजी कदम सोो, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ -३. पुणे शहर श्री. अजय परमार सो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर श्री. दिलीप दाईंगडे साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. उत्तम भजनावळे सोो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री. सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, अमोल पाटील, निलेश भोरडे, गणेश झगडे, देवा चव्हाण, विकास पांडुळे, राहुल ओलेकर, सागर शेडगे, विनायक मोहीते, यांचे पथकाने केली आहे

Tags:
crime news
sinhgad police
S
StarNews Admin
News Desk
Trusted, Unbiased, For the People.
